gay couple marriage  instagram
देश

गे कपल आठ वर्षांच्या डेटिंगनंतर लग्नबंधनात

भारतात समलैगिंक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

गे कपल शनिवारी ६० लोकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले. अशाप्रकारचा तेलगंणातील हा पहिलाच गे विवाह (Gay Couple Marriage) आहे. भारतात समलैगिक विवाहाला अजूनही कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. हैद्राबाद शहराजवळ असलेल्या एका रिसॉर्ट सुप्रियो चक्रबर्ती (Supriyo Chakraborty) (३१) आणि अभय डांगे (Abhay Dange) यांचे लग्न झाले. हे आठ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. सुप्रियो हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा सिनियर फॅकल्टी मेंबर आहे. तर अभय दिल्लीमधील मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो.

engagement ring

अंगठी घालून दोघांनी एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले. या कार्यक्रमात आमच्या जवळच्या लोकांची भाषणे फार हृदयस्पर्शी होती. या समारंभाचे सुत्रसंचालन सोफिया डेव्हिड या हैद्राबादमध्ये LGBTQ समुदायाशी संबंधित असलेल्या आमच्या मैत्रीणिने केले, असे सुप्रियो सांगतो. तसेच, पंजाबी आणि बंगाली पद्धतीने हा लग्न करण्यात आले.

Supriyo Chakraborty-Abhay Dange

हळद, संगीत, मेहंदीही रंगली (Ceremoney)

मेहंदी ही फक्त मुलींनीच काढावी, असंच गृहीत धरलं गेलं आहे. पण आम्हाला नेहमीची ही पद्धत बदलायची होती. म्हणून आम्ही मेहंदीही काढली. बंगाली पद्धतीने हळदही लावली. संगीत कार्यक्रमाला कथक नृत्य सादर केले गेले. आम्हाला वेगळेपणा हवा होता, असे सुप्रियो सांगतो.

gay Soul-Mates

आम्ही सोलमेट्स (Soul-Mates)

भारतात समलैगिंक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर नवरा- बायकोपेक्षा ते एकमेकांना सोल-मेट्स (Soul-Mates) म्हणतात. जेव्हा आम्ही लग्न करणार असल्याचे सांगितले, तेव्हा लोकांकडून विविध प्रतिक्रिया मिळाल्या.मात्र मोठ्या प्रमाणात लोकांनी आमच्या रिलेशनशीपला पाठिंबा दिला. त्यामुळे आमचे लग्न हे सेलिब्रेशन होते,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT