देश

Harshini Kanhekar : पुरुषांच्या फायर कॉलेजमध्ये पहिल्यांदाच एका मुलीने प्रवेश घेतला आणि इतिहास घडवला

पुरुषांसोबत पूर्ण महाविद्यालयात एकटी मुलगी कशी शिकणार असा प्रश्न आईवडिलांनाही पडला होता. पण हर्षिनी यांनी त्यांची समजूत घातली.

नमिता धुरी

मुंबई : आजही भारतात अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात महिलांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यातही संरक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळवण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आजही संपलेला नाही.

२०२३ सालात ही स्थिती असेल तर विचार करा आजपासून २२ वर्षांपूर्वी काय स्थिती असेल ? या काळात अग्निशमन दलात एकही महिला कार्यरत नव्हती. (first indian women Firefighter harshini kanhekar )

पण ज्या शेकडो महिला अग्निशमन दलात कार्यरत आहेत त्यांची मूळ प्रेरणा आहेत हर्षिनी कान्हेकर. या भारतीय अग्निशमन दलातील पहिल्या महिला अग्निशामक आहेत.

खरंतर, हर्षिनी यांना सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. कारण त्या एनसीसी कॅडेट होत्या. पण वाट वाकडी करून त्या अग्निशमन दलात दाखल झाल्या आणि इथेच समस्त महिलावर्गाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं.

२००२ साली वयाच्या २६व्या वर्षी नागपूरच्या नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला तेव्हा तेथे शिकणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. हर्षिनी जेव्हा प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी महाविद्यालयात गेल्या तेव्हा अनेकांनी त्यांना सांगितलं होतं की हे जेन्ट्स कॉलेज असल्याने त्यांनी सैन्यात जावं.

एका व्यक्तीने त्यांचा अर्ज वेगळा ठेवत त्यांना ऐकवलं होतं की, महिला अजूनही ३३ टक्के आरक्षणासाठी लढत आहेत. त्यावर हर्षिनी यांनी उत्तर दिलं की मी ३३ टक्क्यांवर नाही तर ५०:५०वर विश्वास ठेवते. यानंतर त्यांचा अर्ज सगळ्यांसोबत जमा करण्यात आला.

हर्षिनी यांच्या मैत्रिणीनेही अर्ज भरला होता. पण तिची निवड झाली नाही. त्यामुळे सर्व पुरुषांसोबत पूर्ण महाविद्यालयात एकटी मुलगी कशी शिकणार असा प्रश्न आईवडिलांनाही पडला होता. पण हर्षिनी यांनी त्यांची समजूत घातली.

साडे तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात हर्षिनी यांनी कधीही सुट्टी घेतली नाही, कधी उशीर केला नाही किंवा त्यांना कोणती शिक्षाही झाली नाही.

त्यानंतर हर्षिनी ओएनजीसीमध्ये फायर इंजिनिअर म्हणून काम करू लागल्या. भारतातील पहिली महिला अग्निशामक म्हणून त्यांची ओळख कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT