देश

पंधरा वर्षात पहिल्यांदाच कर्नाटकातील 'हे' कुटुंब मंत्रिपदापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यात गोकाकमधील जारकीहोळी कुटुंबातील एकही सदस्य नाही. पंधरा वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी मंत्री होतील, अशी अपेक्षा होती. पहिल्या यादीत त्यांचे नावही होते. पण, शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झाला अन्‌ जारकीहोळी कुटुंबाला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले.

पंधरा वर्षांत जारकीहोळी कुटुंबातील सदस्य मंत्रिमंडळात नाही, असे कधीच झाले नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी जारकीहोळी कुटुंबातील एक मंत्री कायम होता. मात्र, विद्यमान भाजप सरकार त्याला अपवाद ठरले आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघेजण आमदार आहेत. गोकाक मतदारसंघातून रमेश जरकीहोळी (अपात्र), यमकनमर्डीतून सतीश जारकीहोळी (काँग्रेस) व अरभावीतून भालचंद्र जारकीहोळी (भाजप) निवडून आले आहेत.

सर्वच पक्षांच्या मंत्रिमंडळात जारकीहोळी कुटुंबातील एका सदस्याला सतत मंत्रिपद मिळाले आहे. भाजप - धजद आघाडी सरकार असताना भालचंद्र, काँग्रेस-धजद सरकारमध्ये सतीश तर सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात रमेश आणि सतीश यांना स्थान मिळाले होते. एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातही रमेश व सतीश यांनी आलटूनपालटून मंत्रिपद भोगले आहे.

जारकीहोळी कुटुंबाच्या ताब्यात अनेक साखर कारखाने आहेत. सर्व उद्योग क्षेत्रासह राजकारणातही कार्यरत आहे. जारकीहोळी कुटुंबाने अनेक दशकांपासून बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व ठेवले आहे. तरीसुद्धा यावेळी भाजपचे सरकार असूनही भालचंद्र यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. 

सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका
येडियुराप्पा सरकार सत्तेवर यावे, यासाठी रमेश जारकीहोळींनी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी केली. असंतुष्ट आमदारांना संघटीत केले. त्याला भालचंद्र जारकीहोळी यांनी साथ दिली. त्यातून युती सरकारचे पतन होऊन भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु, सध्यातरी मंत्रिमंडळात रमेश किंवा भालचंद्र जारकीहोळी यांपैकी कुणालाही संधी मिळालेली नाही. भविष्यकाळात त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजप सूत्रांचे मत आहे.

सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका
येडियुराप्पा सरकार सत्तेवर यावे, यासाठी रमेश जारकीहोळींनी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी केली. असंतुष्ट आमदारांना संघटीत केले. त्याला भालचंद्र जारकीहोळी यांनी साथ दिली. त्यातून युती सरकारचे पतन होऊन भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु, सध्यातरी मंत्रिमंडळात रमेश किंवा भालचंद्र जारकीहोळी यांपैकी कुणालाही संधी मिळालेली नाही. भविष्यकाळात त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजप सूत्रांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT