देश

एफडीएच्या कारवाईमुळे मासळी व्यवसाय विस्कळीत

प्रशांत शेटये

मडगाव- अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) नोंदणी न केलेली व इन्सुलेटेड नसलेली इतर राज्यांतील मासळीची वाहने गोव्याच्या सीमेवर आजही अडवून माघारी पाठवण्यात आल्याने गोव्यात आज मासळीची टंचाई निर्माण झाली. एफडीएकडून सुरु असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईमुळे गोव्यातील मासळी व्यवसाय विस्कळीत झाला असून कारवाई पुढेही सुरु राहणार असल्याने गोव्यात पुढील काही दिवस मासळीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 

एफडीएने नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेल्या मडगावच्या घाऊक मासळी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने सोमवारपासून मासळी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय मासळी विक्रेत्यांनी घेतला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील मासळी पुरवठादारांना मासळी न पाठवण्याची सूचना या विक्रेत्यांनी आज केल्याने सोमवारपासून पुढील काही दिवस गोव्यात मासळीची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
गोव्याची मासळीची मुख्य बाजारपेठ असलेल्या मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात आज अवघे 20 टन आवक झाली. काही इन्सुलेटेड वाहने चेकनाक्यावरून सोडण्यात आली. ही वाहने आल्याने घाऊक मार्केटात आज थोड्याफार प्रमाणात मासळीची आवक झाली, अशी माहिती मासळीचे एजंट कांता नाही यांनी दिली.

आज आवक झालेल्या मासळी मध्ये वेरली, लेपो, बांगडे व मोरीचा समावेश होता. वेरलीची महाराष्ट्रातील श्रीवर्धन, अलिबाग, रत्नागिरी येथून आवक झाली तर बांगड्यांचा पुरवठा स्थानिक मच्छीमारांकडून झाला असे नाईक यांनी सांगितले मडगाव घाऊक मार्केटात शनिवारी सुमारे चाळीस टन आवक झाली होती. यात स्थानिक मच्छीमारांकडून पुरवठा झालेल्या मासळीचा भरणा जास्त होता. आज आवक अल्प प्रमाणात झाल्याने मासळीचे दर किलोमागे 20 रुपयांनी वाढले. मडगावच्या घाऊक मार्केटात आज वेरली 60 रुपये किलो, बांगडे ८0 रुपये किलो, लेपो 120 रुपये किलो, मोरी 90 ते 100 रुपये किलो असे दर होते.

एफडीएकडे नोंदणी न केलेल्या मासळी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत असल्याने सोमवारी मासळीची आयात व विक्री न करण्याचा निर्णय मासळी एजंट व विक्रेत्यांनी घेतला आहे असे नाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT