Kerala Varkala Fire Google
देश

झोपेतच घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

झोपेत असताना घराला भीषण आग (Fire) लागली. शेजाऱ्यांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण, दुर्दैवानं शेजाऱ्यांचा आवाज पण त्यांनी ऐकला नाही. या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जण जळून ठार झालेत. यामध्ये ८ महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे.

केरळमधील वरकाळाजवळील (Varkala Kerala) चेरुन्नीयूर येथे ही घटना घडली आहे. प्रथापन, त्यांची पत्नी शेर्ली, सून अभिरामी, मुलगा अखिल आणि ८ महिन्याचा नातू रियान, अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये प्रथापन यांचा लहान मुलगा गंभीर असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घराला आग लागली तेव्हा शेजाऱ्यांनी प्रथापन यांच्या कुटुंबीयांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना आवाज ऐकू गेला नाही. एका शेजाऱ्यानं आग लागल्याची माहिती देण्यासाठी फोन केला. पण, तो फोन देखील त्यांनी उचलला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अग्नीशमन दलाला फोन केला. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच घरातील सर्व खोल्या जळाल्या होत्या. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर होता. त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

आग इतकी भीषण होती की घरापुढे ठेवलेल्या तीन दुचाकी देखील जळून खाक झाल्या आहेत. घरात व्हेंटीलेशन नव्हते. तसेच पूर्ण खोल्यांमध्ये एसी होता. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले असावे. त्यातच घरातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला असून आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही, असे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT