देश

मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी, भाजप नेत्यासह पाज जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जंतर मंतर येथे रविवारी भारत जोडो आंदोलनातील वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची परवानगी घेतली नव्हती. आंदोलनादरम्यान मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओत दिसते. याप्रकरणी मंगळवारी पहाटे तीन वाजता भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्यानं हे वृत्त प्रसारित केलं आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर मंतर येथील वादग्रस्त भाषणाप्रकरणी अश्विनी उपाध्याय यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. रविवारी रात्री व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आपला तपास आधिक वेगानं सुरु करत घोषणाबाजी करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. कार्यक्रमाचे आयोजन करणारे भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

सेव्ह इंडिया फाउंडेशनने ८ ऑगस्ट १९४७ रोजीच्या भारत छोडो आंदोलनावर आधारित भारत जोडो आंदोलन पुकारले होते. काल जंतर मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंग आणि सरचिटणीस अरविंद त्यागी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भाजपचे माजी प्रवक्ते अश्‍विनी उपाध्याय आदी आंदोलनात सामील झाले होते. प्रीत सिंह म्हणाले होते, की इंग्रजांच्या कायद्यामुळे देश इंग्रजी मानसिकतेतूनच चालवला जात आहे. ही बाब धोकादायक आहे. देशात पाच स्वदेशी कायदे तत्काळ अमलात आणावेत. समान शिक्षण, समान नागरिक कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा आगामी अधिवेशनात मांडावा. हे कायदे आणण्याचा विचार केला नाही तर रामलिला मैदानावर आंदोलन होईल, असा इशारा देण्यात आला.

यादरम्यान आंदोलनात प्रक्षोभक भाषण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसून येते. त्याची दखल घेत पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अश्‍विनी उपाध्याय यांनी व्हिडिओबाबत म्हटले की, अशा कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषणे दिलेली नाहीत. घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT