road accident sakal media
देश

धुक्यामुळे अपघात, शोकसभेवरुन परतणाऱ्या ३ सख्ख्या भावांचा मृत्यू

नरेश शेंडे

राजस्थान : येथील नागौर जिल्ह्यात (Accident in Rajasthan Nagaur) कार आणि बसचा शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. रस्त्यावर पसरलेल्या धुक्यामुळे कार आणि बसची (car and bus accident) जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, कारमध्ये प्रवास करणारे पाच प्रवासी या अपघातात ठार (Five people killed) झाले असून दोघे जखमी झाले. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे. सिता (65), संजू (२२), राहूल (१०), अजय (५) आणि भलीराम (४२) अशी मृतांची नावे आहेत. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Five people killed in car and bus accident at Rajasthan nagaur district)

जोधपूर महामार्गावर चिमरानी गावाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव बस जोधपूरवरुन नागौरमार्गे बीकानेर येथे जात होती. तर कार जोधपूरच्या दिशेने जात होती. कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने धडक दिली. धुक्यामुळे महामार्गावरील दृश्यमानता कमी होती. यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

अपघातात संजू, राहुल, सीता आणि भालीराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अजयचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवासी हे गावातील नातेवाईकाच्या शोकसभेवरुन घरी परतत होते. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT