five sons dies due to coronavirus after mother died at jharkhand 
देश

आईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू...

वृत्तसंस्था

धनबाद (झारखंड): कोरोनामुळे येथील संपूर्ण कुटुंब पंधरा दिवसांमध्ये उद्धवस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू झाला, तर सातव्याची प्रकृती गंभीर आहे. आईच्या पार्थिवाला खांदा दिलेल्या पाचही मुलांचा मृत्यू झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका कुटुंबामध्ये कोरोना प्रवेश केला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सहा जणांचा गेल्या 15 दिवसात मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना धनबादच्या कात्रस भागात घडली आहे. येथील रांची बाजारात राहणाऱ्या एका 88 वर्षीय महिलेचा 4 जुलै रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आईच्या पार्थिवाला मुलांनी खांदा दिला होता. यानंतर त्यांनाही कोरोना झाला होता. त्यानंतर, त्यांच्या एका मुलाचा बीसीसीएलच्या सेंट्रल हॉस्पिटल कोव्हिड-सेंटरमध्ये मृत्यू झाला, तर दुसर्‍या मुलाचा मृत्यू पीएमसीएचमध्ये झाला. यानंतर, एका मागून एक तब्बल 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. भारतातील अशी ही पहिली घटना आहे, ज्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यही आजारी आहेत.

दरम्यान, आईच्या मृत्यूनंतर एक-एक करून पाचही मुलांचा मृत्यू झाला. तर, सहाव्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. धनबादमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, यातील 6 एकाच कुटुंबातील आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये ही महिला एका लग्न समारंभाला गेली होती. यासाठी दिल्लीहून कात्रस येथील तिच्या घरी आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.

देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजारहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांतही 37 हजार 140 नवीन रुग्ण सापडले आहेत.  24 तासांत 587 रुग्णांचा मृत्यू झाला, यासह देशातील एकूण मृतांचा आकडा 28 हजार पार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

आजचे राशिभविष्य - 14 मे 2026

Sattu Buttermilk Recipe: उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला आतून थंडावा देणारं सुपर देसी ड्रिंक! घरच्या घरी झटपट बनवा 'सत्तूचं ताक'

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

SCROLL FOR NEXT