5 year demonetisation sakal media
देश

नोटाबंदीची पाच वर्षे : विरोधकांकडून विचारले जाताहेत सवाल!

PM मोदींनी पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर तर सीपीआयचे नेते सीताराम येचुरी यांनी ट्विट करत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

प्रियंका गांधी मोदी सरकारला सवाल करताना म्हणाल्या, जर नोटाबंदी यशस्वी झाली आहे तर भ्रष्टाचार का संपलेला नाही? काळापैसा परत का आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का नाही झाली? दहशतवादावर प्रहार का झालेला नाही? महागाईवर नियंत्रण का नाही?

दुसरीकडे "आजारी विचार आणि वाईट पद्धतीनं राबवलेला निर्णय" अशा शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी नोटाबंदीचं विश्लेषण करताना म्हटलं आहे. "पाच वर्षापूर्वी आजच्याच दिवशी कुठलाही विचार न करता अचानकपणे चुकीचा निर्णय घेतला गेला आणि त्याची चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणीही झाली. यामुळे देशाची अर्थव्यवस्था तळाला पोहोचली आहे. आता याची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे," असं ट्विट शशी थरुर यांनी केलं.

दरम्यान, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (सीपीआय) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी देखील मोदी सरकारच्या या नोटाबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. "एका अविचारी निर्णयामुळं अर्थव्यवस्था, गरीबांना दुखापत झाली. अनौपचारिक क्षेत्र उद्ध्वस्त झालं. काळा पैसा वसूल झाला नाही पण श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. अर्थव्यवस्थेत रोख रक्कमेचा ओघ आत्तापर्यंत सर्वाधिक आहे. केवळ एका माणसाच्या अविचारी निर्णयानं भारताला आणखी दरीत ढकलण्यात आलं याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी," असंही येचुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वाजता अचानकपणे टीव्हीवर येऊन देशाला संबोधित केलं होतं. यामध्ये आजच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरवण्यात येत असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली होती. केंद्र सरकारच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळं सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. लोकांना नव्या नोटा घेण्यासाठी एटीएमबाहेर अनेक महिन्यांपर्यंत लांबलचक रांगा लावाव्या लागल्या. बँकांचे उंबरे झिझवावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT