note currency 
देश

Currency Despute: चलनवादात आता काँग्रेस नेत्याचीही उडी; डॉ. आंबेडकरांच्या फोटोची केली मागणी

आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली होती. त्यानंतर यावरुन देशभरात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. यानंतर नोटांवर शिवाजी महाराजांची प्रतिमा असावी अशी मागणीही झाली. त्यानंतर आता डॉ. आंबेडकरांचा फोटो नोटांवर असणं जास्त लवचिक राहिलं, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं म्हटलं आहे. (flexibility to accommodate Dr Ambedkar on currency note says Congress leader Manish Tiwari)

काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी म्हटलं, भारतीय चलन हे देशाच्या सार्वभौमत्वाचं प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सार्वभौमत्वाला घटनात्मक रुप दिलं आहे, त्यामुळं नोटांवर डॉ. आंबेडकरांचा फोटो असणं हे अधिक लवचिक अर्थात सर्वमान्य राहिलं. त्याचबरोबर गणपती, लक्ष्मी, पौराणिक चिन्हं तसेच वर्तमानातील काही चिन्हंही सामावून घेण्याची लवचिकता चलनी नोटांमध्ये आहे, असंही त्यांनी म्हटलं.

गणपती आणि लक्ष्मी यांचं भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे. कोणतंही महत्वाचं काम सुरु करताना आपण या देवतांची प्रार्थना करतो. त्यामुळं मी केजरीवालांच्या विधानाच्या विरोधात नाही. त्यामुळं ते त्यांच्या जागी योग्य आहेत, असंही काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT