Delhi Rain Sakal
देश

Video : "दिल्ली तळ्यांचं शहर होतंय"; पावसात रस्त्यावर तळे, केजरीवालांच ते वक्तव्य तरूणांनी खरं ठरवलं

पूर्ण दिल्लीमध्ये आम्ही ३८० तळे बनवत आहोत. दिल्ली हळूहळू तळ्यांचं शहर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

"आम्ही दिल्ली शहरामध्ये ३८० तळे बांधणार आहोत, येत्या काळात हळूहळू दिल्ली हे तळ्यांचे शहर बनेल" असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांनी एका सभेत केलं होतं. त्यानंतर आता दिल्लीमध्ये पावसाने थैमान घातले असून तळेमय झालेल्या भागाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या तीन तरूणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगा एका तरंगत्या वस्तूवर बसून पाण्यातून प्रवास करत आहे. तर त्याच्या हाताला धरून दोन तरूण त्याला गाडीवरून ओढत घेऊन चाललेले आहेत. हे चित्र पाहून सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहताना दिसत आहे. तर या व्हिडिओला अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाचा आवाज लावण्यात आला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली असून मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर "अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत तळे बांधण्याची गरज नाही. पावसामुळे आयते तळे दिल्लीला मिळाले आहेत" अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT