Nirmala Sitharaman Google file photo
देश

इन्कम टॅक्सचं नवं पोर्टल पहिल्याच दिवशी फेल

प्राप्तिकर विभागाने घोषणा केली होती की, नवीन पोर्टल ७ जून रोजी सकाळी सुरू होईल, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे पोर्टल रात्री उशिरा लाँच करण्यात आले.

वृत्तसंस्था

प्राप्तिकर विभागाने घोषणा केली होती की, नवीन पोर्टल ७ जून रोजी सकाळी सुरू होईल, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे पोर्टल रात्री उशिरा लाँच करण्यात आले.

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागातर्फे (Income Tax Department) सोमवारी (ता.७) रात्री नवे आयकर ई-फायलिंग पोर्टल (New Income Tax e-filing Portal) सुरू केलं. आयटीआर भरण्यासह कर परताव्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने याची सुरवात करण्यात आली होती. पण पहिल्याच दिवशी करदात्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सोशल मीडियावरही सरकारची टर उडविण्यात आली. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचाही पारा चढला होता. सीतारामण यांनी या प्रकरणी ट्विट करत इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्याकडे जाब विचारला आहे. (Nirmala Sitharaman nudges Infosys on ITR e-filling portal glitches)

नव्या ई-फायलिंग पोर्टलची रचना आणि देखभाल करण्याची जबाबदारी आयटी कंपनी इन्फोसिसकडे देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी आलेल्या अडचणींमुळे अर्थमंत्र्यांनी निलेकणींना वेबसाइटमधील त्रुटी दूर करण्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. इन्फोसिस आणि निलेकणी करदात्यांना सुलभ सेवा पुरविण्याबाबत निराश करणार नाहीत, अशी आशा करते," असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

अर्थमंत्र्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “बहुप्रतिक्षित ई-फाईलिंग पोर्टल २.० काल रात्री २०:४५ वाजता सुरू करण्यात आले. माझ्या टीएलमध्ये मला बर्‍याच तक्रारी आणि त्रुटी आढळल्या. आशा आहे की, इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांनी प्रदान केलेली सेवा आम्हाला आणि आमच्या करदात्यांना निराश करणार नाही. करदात्यांना मिळणारी सेवा सुलभ करण्याकडे प्राधान्य असले पाहिजे."

लाँचिंगला झाला उशीर

प्राप्तिकर विभागाने घोषणा केली होती की, नवीन पोर्टल ७ जून रोजी सकाळी सुरू होईल, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे पोर्टल रात्री उशिरा लाँच करण्यात आले. या दरम्यान लोकांना त्रासही सहन करावा लागला. नवीन पोर्टल सुरू करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने जुने पोर्टल १ ते ६ जूनपर्यंत बंद ठेवले होते.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT