Focus on house-to-house survey, prompt COVID-19 testing 
देश

केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह दहा राज्यात घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाची वाढती लोकसंख्या पाहून हा निर्णय घेतला आहे. दहा राज्यातील ३८ जिल्ह्यात तातडीची चाचणी आणि आवश्यक ती निगराणी ठेवली जाणार असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यामुळे संसर्ग आणि मृत्यू दर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दिवसेंदिवस देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात महाराष्ट्रासह देशातील १० राज्यात करोनाचा विळखा आधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध ४५ महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत प्रीती सुदान यांनी सांगितले की, लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह १० राज्यांनी येत्या काही महिन्यात जिल्हानिहाय नियोजन करायला हवं. कँटॉन्मेंट झोनमध्ये केसेसचं व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी यावर लक्ष देण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
२५ मे रोजी भारत कोरोनारुग्णांच्या बाबतीत जगातील अव्वल दहा देशांमध्ये पोहोचला आणि आता अवघ्या तेरा दिवसांत भारत जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सुदैवाने भारतात रुग्णांच्या आकड्याच्या तुलनेत मृत्यूदर खूप कमी आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. दररोज जवळपास दहा हजार कोरोनाबाधित रूग्ण आढत आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. दहा राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक असल्यामुळे तिकडे केंद्र सरकारने आपलं जास्त लक्ष दिलं आहे.

ती १० राज्ये कोणती?
१) महाराष्ट्र
२) तेलंगणा
३) तामिळनाडू
४ )राजस्थान
५) हरियाणा
६) गुजरात
७) जम्मू काश्मीर
८) कर्नाटक
९) उत्तराखंड 
१०) मध्य प्रदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT