‘अंतिम अरदास’साठी राजकारण्यांना व्यासपीठावर मज्जाव sakal
देश

‘अंतिम अरदास’साठी राजकारण्यांना व्यासपीठावर मज्जाव

तिकोनिया गावात झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या चार शेतकऱ्यांसाठी मंगळवारी ‘अंतिम अरदास’ (अंतिम प्रार्थना) होणार असून त्यावेळी व्यासपीठावर कोणताही राजकीय नेता उपस्थित नसेल

सकाळ वृत्तसेवा

लखीमपूर खेरी : तिकोनिया गावात ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या चार शेतकऱ्यांसाठी मंगळवारी (ता. १२) ‘अंतिम अरदास’ (अंतिम प्रार्थना) होणार असून त्यावेळी व्यासपीठावर कोणताही राजकीय नेता उपस्थित नसेल, असे भारतीय किसान संघटनेच्या वतीने (बीकेयू-टिकैत) आज सांगण्यात आले.

भाजपचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या मोटारीखाली चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, असा दावा आंदोलकांनी केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी शीख धर्मानुसार उद्या अंतिम प्रार्थना होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी झाली आहे, असे ‘बीकेयू-टिकैत’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमनदीप सिंग संधू म्हणाले. या प्रार्थनेत राजकीय नेते सहभागी होणार का, असे विचारले असता, ‘व्यासपीठावर केवळ संयुक्त किसान मोर्चाचे नेते असतील. एकाही राजकीय नेत्याला तेथे उपस्थित राहू दिले जाणार नाही,’ असा स्पष्ट इशारा संघटनेचे उपाध्यक्ष बलकार सिंग यांनी दिला. विविध राज्यांमधील आणि उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमधील शेतकरी संघटनांचे नेते व सदस्य ‘अरदास’ आणि ‘भोग’ (प्रसाद) कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. याशिवाय अन्य कोणताही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘शहीद किसान यात्रा’

जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मृत शेतकऱ्यांची राख घेऊन ‘शहीद किसान यात्रा’ काढण्याचा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे. तसेच येत्या १८ रोजी देशभरात सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येईल. शिवाय लखनौला येत्या २६ रोजी महापंचायतीचे आयोजन करण्याचे आवाहन ‘एसकेएम’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव अजूनही फरार

SCROLL FOR NEXT