Karpoori Thakur Bharat Ratna sakal
देश

Karpoori Thakur Bharat Ratna : केंद्र सरकारची मोठी घोषणा! बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न

Kiran Mahanavar

Bharat Ratna : केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्यात येणार आहे. कर्पूरी ठाकूर यांची 24 जानेवारी रोजी 100 वी जयंती आहे. याच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने त्यांना हा सन्मान देण्याची घोषणा केली आहे.

कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते. सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे ते बिहारमधील तिसरे व्यक्ती असणार आहेत. त्यांच्या आधी हा सन्मान पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना देण्यात आला होता.

साधारणपणे केंद्र सरकार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कधी पद्म पुरस्कार तर कधी भारतरत्न जाहीर करते. यावेळी सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी भारतरत्न जाहीर केला आहे. 24 जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आतापर्यंत 48 जणांना मिळाला हा सन्मान

सुमारे 68 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सर्वोच्च सन्मानाने आतापर्यंत 48 सेलिब्रिटींना सन्मानित करण्यात आले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राज गोपालाचारी, शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 मध्ये हा प्रथम हा सन्मान देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT