Former CM Farooq Abdullah  
देश

Jammu Kashmir Assembly Election Results 2024 : सत्ता स्थापनेसाठी कट्टर विरोधक येणार एकत्र ? फारुख अब्दुल्ला यांचे सूतोवाच

Jammu Kashmir Assembly Election Results 2024 Latest News : ‘एनसी’-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याच्या ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या भूमिकेचे स्वागत डॉ. अब्दुल्ला यांनी केले.

जावेद मात्झी ः सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर, ता. ७ ः जम्मू-काश्‍मीरमधील प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ (पीडीपी)चा पाठिंबा स्वीकारणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) प्रमुख डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी सोमवारी जाहीर केले. राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी ‘एनसी’ ‘पीडीपी’चा समर्थन घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

‘एनसी’-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याच्या ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या भूमिकेचे स्वागत डॉ. अब्दुल्ला यांनी केले. ते म्हणाले, ‘‘पीडीपी’च्या पाठिंब्याचा मी मनापासून स्वीकार करेन. जम्मू-काश्मीरची स्थिती सुधारण्यासाठी येथील पक्षांनी एकत्र येण्याचे मी स्वागत करतो,” राज्यातून ३७० कलम हद्दपार केले त्या दिवसापासून जम्मू-काश्मीरला भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकतेची गरज त्यांनी अधोरेखित केली. इतर पक्ष ‘एनसी’शी संपर्क साधत आहेत का असे विचारले असता अनेकांनी आधीच पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकार स्थापनेनंतरच्या आव्हानांबाबत ते म्हणाले, की ‘जम्मू आणि काश्मीरचा पूर्ण दर्जा काढून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, येथील भौगोलिक व राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार त्याचे महत्त्व ओळखेल, अशी आशा आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पाच आमदारांच्या नियुक्ती केल्याच्या मुद्द्यावर बोलताना, ‘‘असे निर्णय फक्त निवडून आलेल्या सरकारनेच घ्यावेत. आम्हाला विधानसभेत पात्र व्यक्ती हव्या आहेत. निवडून आलेल्या सरकारच्या शिफारशी नायब राज्यपालांनी मंजूर केल्या पाहिजेत,’’ असे ते म्हणाले.

‘पीडीपी’कडून पाठिंबा जाहीर

निवडणुकीच्या उद्याच्या (ता.८) मतमोजणीच्या आधीच ‘पीडीपी’चे वरिष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री नईम अख्तर यांनी गरज भासल्यास काँग्रेस-‘एनसी’ आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की काँग्रेसचा समावेश असलेल्या कोणत्याही धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा देण्यास आम्ही तयार आहोत. कारण आम्ही ‘इंडिया’ आघाडीचा एक भाग आहोत, असे ते म्हणाले. काँग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्सशी सध्या ‘पीडीपी’ची चर्चा सुरू आहे का, असे विचारले असता अख्तर यांनी ‘नाही’ असे मोघम सांगत उत्तर देणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT