देश

काँग्रेसला धक्का, सुष्मिता देव यांचा राजीनामा

नामदेव कुंभार

काँग्रेसच्या माजी खासदार आणि विद्यमान अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करत सुष्मिता देव यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सुष्मिता देव यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवला आहे. सुष्मिता देव यांचा राजीनामा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे नेते संतोष मोहन देव यांच्या त्या कन्या आहेत.

राजीनामा देण्यापूर्वी सुष्मिता देव यांनी ट्वीटरवरही आपल्या प्रोफाईलमध्ये काँग्रेसची माजी सदस्य असा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे सुष्मिता देव यांनी पक्षाचा व्हाॅट्सअॅप ग्रुपही सोडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तीन दशकांपासून त्या काँग्रेससोबत जोडल्या गेल्या होत्या. सुष्मिता देव या टीम राहुल सदस्य होत्या. सुष्मिता देव यांनी पक्ष सोडण्याचं कोणतेही कारण अद्याप दिलेलं नाही. अथवा त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत? याबाबतचं कोणतीही माहिती नाही. सार्वजनिक आयुष्यात नवीन सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांची ट्विटर खाती ब्लॉक करण्यात आली होती. यामध्ये सुष्मिता देवी यांच्या ट्विटर खात्याचाही समावेश होता. सुष्मिता देव यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली होती. तेव्हापासून त्या काँग्रेसला रामराम करणार, अशी चर्चा सुरु होती. आसाम मधील बराक खोऱ्याचं प्रतिनिधीत्व सुष्मिता देवी करतात. येथील जनतेचा सीएएला पाठिंबा असल्याने आपणही विधेयकाच्या बाजूने आहोत, असे देव यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT