Crime news 
देश

नंबर प्लेट नसलेल्या कारची माजी आयबी अधिकाऱ्याला धडक; पोलिसांचा मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू - कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये शुक्रवारी इंटेलिजन्स ब्युरोच्या एका माजी अधिकाऱ्याला कारने चिरडून ठार करण्यात आले. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली. ही घटना अपघात नसून जाणूनबुजून केलेली हत्या असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. (Crime news in Marathi)

पोलिसांनी सांगितले की, धडक देणाऱ्या वाहनाला नंबर प्लेटही नव्हती. हा अपघात असल्याचे पोलिसांनी सुरुवातीला मान्य केले. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर हा अपघात जाणूनबुजून घडवून आणल्याचं स्पष्ट झालं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक भरधाव कार एका 82 वर्षीय व्यक्तीकडे जात आहे. त्यानंतर कारचालक रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक देते आणि घटनास्थळावरून पळून काढते.

म्हैसूरचे पोलीस आयुक्त चंद्रगुप्ता म्हणाले, "तपासानंतर आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की, हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला खून आहे. ते पुढे म्हणाले, "चारचाकी वाहनांच्या वापरासाठीची ही अरुंद गल्ली होती. असे दिसते आहे की आरोपी कुलकर्णीचा पाठलाग करत होता."

आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून हत्येमागील हेतूचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुलकर्णी हे तीन दशकांहून अधिक काळ इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सेवा बजावून २३ वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT