Former Judge Joseph Kurian 100 percent opposed to same-sex marriage
Former Judge Joseph Kurian 100 percent opposed to same-sex marriage  esakal
देश

Same-Sex Marriage : समलिंगी विवाहांना माझा १०० टक्के विरोध - माजी न्यायाधीश जोसेफ कुरियन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : `` मी समलिंगी विवाहांच्या विरोधात आहे,`` असे प्रतिपादन माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. ``समलिंगी संबंधांना युनियन किंवा असोसिएशन असे म्हटले जाऊ शकते. मात्र असा प्रकारच्या विवाहांच्या विरोधात मी आहे.`` असे न्या. जोसेफ यांनी म्हटले आहे.

“विवाहाचा उद्देश वेगळा असतो. विवाहाचे मूळ हे पुरुष आणि स्त्री यांच्यातील मीलन आहे. विवाहानंतर स्त्री पुरुष एकत्र येऊन मुलांना जन्म देतात. मी समलिंगी संबंधांच्या विवाहाला मान्यता देण्यास १०० टक्के विरोधात आहे. समलिंगी विवाह नैतिकतेला धरुन नाही,`` असे न्या जोसेफ यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ``समलिंगी विवाह हा मुद्दा धर्म आणि संस्कृतीशी घट्टपणे जोडला गेला आहे. या मुद्द्यावर नैतिक स्तरावर वाद-विवाद झाले पाहिजेत. मात्र आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे त्यामुळे मी यावर फार भाष्य करू इच्छित नाही’’.

विनाकारण प्रसिद्धी

अनेक वर्षे तुरुंगात असलेल्या कच्च्या कैद्यांबाबतच्या सुनावणी अधिक महत्त्वाच्या आहेत. मात्र समलिंगी विवाहांसारख्या विषयांना जास्त प्रसिद्धी मिळते, अशी खंतही न्या. जोसेफ कुरियन यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

SCROLL FOR NEXT