manmohan-sigh.jpg 
देश

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 'डिस्चार्ज', प्रकृतीत सुधारणा

ओमकार वाबळे

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना रविवारी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून (AIIMS) उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. डॉ सिंग यांना संध्याकाळी 5.20 वाजता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

13 ऑक्टोबर रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. मनमोहन सिंग यांच्या वयोमानानुसार प्रकृतीत सुधारणा होण्यास अतिरिक्त कालावधी लागला. अशक्तपणामुळे हे घडल्याचं समोर येत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रुग्णालयात येऊन सिंग यांची विचारपूस केली होती. त्यावेळी मनमोहन सिंग यांचा एक फोटो व्हायरल झाला. ज्यावर त्यांची कन्या दामनसिंग यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात काँट्रोव्हर्सीही झाली होती.

यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही रुग्णालयात येऊन सिंग यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. 89 वर्षांच्या माजी पंतप्रधानांना हॉस्पिटलच्या कार्डिओ-न्यूरो सेंटरमधील एका खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉ. नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील हृदयरोगतज्ज्ञांच्या पथकाच्या देखरेखीखाली होते. अखेर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसंदर्भातील महाविकास आघाडीची बैठक संपली

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT