Supreme Court sakal
देश

मतदान करण्यास नकार देणाऱ्या दोघांच्या हत्येप्रकरणी माजी खासदार दोषी; SCने बदलला हायकोर्टाचा निकाल

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - आरजेडीचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना 1995च्या दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवण्यात आले आहे. कनिष्ठ न्यायालय आणि पाटणा उच्च न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

या प्रकरणात 1 सप्टेंबर रोजी शिक्षेवर चर्चा होणार आहे. न्यायालयाने बिहारचे मुख्य सचिव आणि डीजीपीसह प्रभुनाथ सिंह यांना हजर राहण्यास सांगितले आहे. सध्या प्रभुनाथ सिंह दुसऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहे.

1995 च्या निवडणुकीत प्रभुनाथ सिंह यांच्या सूचनेनुसार मतदान न केल्याने, छपरा येथील मसरख येथील राजेंद्र राय आणि दरोगा राय यांची हत्या झाली होती. या प्रकरणी दोषी ठरलेल्या माजी खासदारांच्या शिक्षेवरील चर्चेसाठी सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.

बिहारच्या महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा जेडीयूचे खासदार आणि एकदा आरजेडीच्या तिकीटावर असलेले प्रभुनाथ सिंह यांच्यावर 1995 मध्ये मसरख येथील मतदान केंद्राजवळ 47 वर्षीय दरोगा राय आणि 18 वर्षीय राजेंद्र राय यांची हत्या केल्याचा आरोप होता. दोघांनी प्रभुनाथ सिंह यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मतदान केले नाही, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

साक्षीदारांना धमकावल्याची मृत राजेंद्र रायच्या भावाने तक्रार केल्यानंतर हा खटला छपरा येथून पाटणा येथे वर्ग करण्यात आला होता, जिथे पुढील सुनावणी झाली. 2008 मध्ये पाटणा कोर्टाने पुराव्याअभावी प्रभुनाथ सिंह यांची निर्दोष मुक्तता केली होती. 2012 मध्ये पाटणा उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. यानंतर मृताच्या भावाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT