लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन. 
देश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं दीर्घ आजारानं शनिवारी (दि. २१) रात्री सव्वा नऊच्या सुमारास निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. लखनऊ येथील संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. २३ ऑगस्ट रोजी नरोरा येथे गंगेच्या घाटावर कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी दिली. राम मंदिर आंदोलनात कल्याण सिंह इतके सक्रीय होते की, त्यांना आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देखील त्यागावी लागली होती.

एएनआयच्या माहितीनुसार, कल्याण सिंह यांचं सेप्सिस आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळं निधनं झालं. आज (दि.२१) संध्याकाळी त्यांची प्रकृती खूपच खालावल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. कल्याण सिंह यांची प्रकृती क्रिटिकल बनली असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याचं रुग्णालयानं त्यांच्या प्रकृतीसंबंधीचं मेडिकल बुलेटिन जाहीर करताना सांगितलं होतं.

संसर्ग आणि शुद्ध हरपल्यानं कल्याण सिंह यांना ४ जुलै रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तत्पूर्वी त्यांच्यावर डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार सुरु होते. कल्याण सिंह यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं होतं.

उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राज्य दुखवटा

कल्याण सिंह यांच्या निधनामुळं उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राज्य दुखवटा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी नरोरा येथे गंगेच्या घाटावर कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. २३ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी असेल, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

कल्याण सिंह यांच्या निधनाची बातमी कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कल्याण सिंह मुत्सदी राजकारणी होते - पतंप्रधान

कल्याण सिंह भारतीय राजकारणातील दिग्गज - राजनाथ सिंह

कल्याण सिंह यांची पोकळी भरुन काढणं कठीण - अमित शहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

"हम मजदूर आदमी हैं", मोहम्मद शमीने पुन्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरला टोमणा हाणला, आता हा वाद आणखी पेटणार?

Paithan Pachod Education News: पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

SCROLL FOR NEXT