Formula for counting the poor changed Formula for counting the poor changed
देश

...तरच तुम्ही ठरणार ‘अत्यंत गरीब’; गरिबीची गणना करण्याचे सूत्र बदलले

सकाळ डिजिटल टीम

जागतिक बँकेने (World Bank) अत्यंत गरिबीची (poor) गणना करण्याचे सूत्र बदलले आहे. सन २०२२ पासून पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारे १६६ रुपये प्रतिदिवस पेक्षा कमी कमावणारे लोक अत्यंत गरीब मानले जातील. जागतिक बँकेची नवीन दारिद्र्यरेषा २०१७ च्या किमतींवर आधारित आहे. पूर्वी ज्यांची कमाई १४७ रुपये प्रतिदिवस होती त्यांना अत्यंत गरीब मानले जात होते. जुना फॉर्म्युला २०१५ च्या किमतींवर आधारित होता. (Formula for counting the poor changed)

नवीन मानक लागू झाल्यानंतर अत्यंत गरीब (poor) लोकांच्या संख्येत ०.२ टक्क्यांनी घट झाली आहे. आता जागतिक बँकेच्या दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचा वाटा ९.१ टक्के आहे. आकड्यांचा विचार केला तर नवीन फॉर्म्युल्यामुळे अत्यंत गरीब लोकांची संख्या दीड कोटींनी कमी झाली आहे. मात्र, या टंचाईनंतरही जगातील अत्यंत गरीब लोकांची लोकसंख्या ६८ कोटी आहे. म्हणजे ६८ कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न १६६ रुपयांपेक्षा कमी आहे.

अत्यंत गरीब (Extreme Poverty) लोकांची एकूण संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे गरीब आफ्रिकन देशांच्या क्रयशक्तीत झालेली सुधारणा. जुन्या फॉर्म्युल्यानुसार, जगातील सर्वांत गरीब लोकांपैकी ६२ टक्के लोक आफ्रिकन देशांमध्ये राहत होते. नव्या सूत्राच्या आधारे या देशांचा वाटा ५८ टक्क्यांवर आला आहे. तरीही जगातील सर्वांत गरीब लोकसंख्या या देशांमध्ये राहते, असे जागतिक बँकेने (World Bank) म्हटले आहे.

उप-सहारा आफ्रिकेतील महागाईत अन्न घटकांचा वाटा ४० टक्के आहे. या देशांतील अन्नधान्याची चलनवाढ नाममात्र असल्यामुळे त्यांची क्रयशक्ती सुधारली आहे, असेही जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

भारतात गरिबांची संख्या कमी झाली

मागील काही वर्षांत भारतात गरिबांची संख्या कमी झाली आहे. २०११ ते २०१९ या वर्षात दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या (BPL) १२.३ टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतात गरिबांची (poor) संख्या कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील गरिबी कमी होणे. या काळात ग्रामीण भारतातील अत्यंत गरीब लोकांची संख्या निम्म्यावर आली. ती १०.२ टक्क्यांवर आली.

कोरोना महामारीचा गंभीर परिणाम

कोरोना महामारीचा गरिबीविरुद्धच्या जगाच्या लढाईवर गंभीर परिणाम झाला. अनेक अहवाल असे सुचवतात की महामारीने भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांना दारिद्र्यरेषेवर ढकलले. जे गेल्या वर्षांच्या प्रयत्नांमुळे अत्यंत दारिद्र्यमधून बाहेर पडू शकले. याशिवाय कोट्यवधी मध्यमवर्गही साथीच्या रोगामुळे अत्यंत गरीब झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT