Crime News 
देश

OYO रुममध्ये छुपा कॅमेरा लावून जोडप्यांचे खासगी क्षण केले रेकॉर्ड, त्यानंतर...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नोएडातील ओयो हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. नोएडातील गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अन्य टोळ्यांशीही आरोपींचा संबंध होता, असेही सांगण्यात आलं आहे. (OYO room news in Marathi)

आरोपींनी हॉटेलच्या खोल्यांमध्ये छुप्या कॅमेऱ्याने जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर जोडप्यांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्याला आरोपींनी व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. या रॅकेटमध्ये हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

पोलिसांनी सांगितले की, टोळीच्या सदस्यांनी आधी ओयो हॉटेल्समधील खोल्या बुक केल्या. त्यानंतर चेकआउट करण्यापूर्वी आरोपींनी खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे लावले. काही दिवसांनी हे लोक पुन्हा हॉटेल्समध्ये गेले आणि त्यांनी कॅमेरे बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी जोडप्यांशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना आरोपींनी व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, १० मोटरसायकली जप्त

Karad Crime : शेणोलीजवळ सिग्नलवर लाल फडके टाकुन प्रकार सह्याद्री एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; अज्ञात चौघाविरोधात गुन्हा

Motor Vehicle Rule: चालकांना दिलासा! आता अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT