Accident News Esakal
देश

Accident News: मदुराई जिल्ह्यात कार अन् कंटेनरची धडक, भीषण अपघात 4 जणांचा मृत्यू

मदुराई जिल्ह्यातील थिरुमंगलमजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मदुराई जिल्ह्यातील थिरुमंगलमजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे: मदुराईचे एसपी शिव प्रसाद यांनी या अपघाताची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. हा अपघात कसा घडला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून, याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

तामिळनाडूच्या मदुराई येथे कार आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तींची ओळख पटवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मदुराई जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) शिव प्रसाद यांनी या अपघाताची माहिती दिली आहे.

या अपघाताची संपुर्ण माहिती मिळालेली नाही. याआधी रविवारी, तामिळनाडूच्या मदुराई येथील मस्तानपट्टी टोल प्लाझाच्या एका कर्मचाऱ्याचा वेगवान ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत सतीश कुमार हा मदुराई जिल्ह्यातील सखीमंगलम येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टोल नाक्यावर सतीश कुमार यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT