Cochin University 
देश

मोठी बातमी! कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Sandip Kapde

Cochin University : कोचीच्या कलामसेरी येथील कॅम्पसमध्ये टेक फेस्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. कॅम्पसमधील ओपन एअर ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमात सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.

अचानक झालेल्या पावसात विद्यार्थ्यांनी स्टेजवर धाव घेतल्याने चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. गर्दीमुळे काही विद्यार्थी खाली पडले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

पार्श्वगायिका निकिता गांधी यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी जमले होते. पीडितांमध्ये दोन मुले आणि दोन मुली आहेत. तर 46 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना कळमसेरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. (Latest Marathi News)

एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उमेश यांनी सांगितले की, दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांचे पथक रुग्णालयात पोहोचले.

तसेच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हणाले, या घटनेत 64 जण जखमी झाले आहेत. याशिवाय 18 जणांना कोची येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. चार विद्यार्थ्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची ओळख पटलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

Honour Killing: साखरपुड्याच्या आदल्या दिवशी १९ वर्षीय तरुणीची हत्या; जन्मदात्या पित्यानेच आवळला गळा?

Latest Marathi News Live Update: कल्याण-डोंबिवलीत दररोज २५ दशलक्ष लिटर पाण्याची चोरी

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

Property Card: फ्लॅट खरेदी-विक्री करायचाय? मग ही बातमी वाचाच! सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ७ कोटी घरमालकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT