Rajyasabha  sakal
देश

Rajyasabha : सोनिया, वैष्णव यांच्यासह १४ नेत्यांनी घेतली शपथ

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह चौदा नेत्यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह चौदा नेत्यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

याशिवाय अजय माकन, सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), आर. पी. एन. सिंह, मदन राठोड, सामिक भट्टाचार्य (भाजप), संजयकुमार झा (संयुक्त जनता दल), शुभाशिष खुंटीया, देबाशिष सामंतराय (बिजू जनता दल), गोल्ला बाबूराव, एम. आर. रेड्डी, वाय. व्ही. सुब्बा रेड्डी (वायएसआर काँग्रेस) आणि रवीचंद्र वाडीराजू (बीआरएस) यांनी शपथ घेतली.

सोनिया गांधी राजस्थानमधून तर अश्विनी वैष्णव ओडिशामधून राज्यसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसचे कोशाध्यक्ष अजय माकन व सय्यद नासिर हुसेन हे कर्नाटकमधून, आर. पी. एन. सिंह हे उत्तर प्रदेशातून, मदन राठोड हे राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. सोनिया गांधी या पहिल्यांदाच वरिष्ठ सदनाच्या सदस्या बनल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT