Marriage 
देश

Fraud Marriage: पैशांचा लोभ.. भाऊ-बहिणीलाच घ्यायला लावले 'सात फेरे'; प्रकरण नेमकं काय?

marriage between brother and sister: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत अनुदान आणि काही वस्तू दिल्या जातात.

कार्तिक पुजारी

लखनऊ- यूपीच्या मगराजगंज जिल्ह्यातील लक्ष्मीपूर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत अनुदान आणि काही वस्तू दिल्या जातात. याच्याच लोभापाई भाऊ-बहिणीचे नातेवाईक आणि दलालांनी लग्न लावून दिले आहे. जेव्हा घटना समोर आली तेव्हा एकच खळबळ उडाली. (fraud marriage between brother and sister in up Maharajganj greed of money)

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत पाच मार्च रोजी लक्ष्मीपूर ब्लॉकमध्ये ३८ जोडप्यांचे लग्न झाले होते. लक्ष्मीपूर भागातील एका महिलेने देखील लग्नासाठी नोंदणी केली होती. दाव्यानुसार, महिलेचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तिचा पती कामानिमित्त बाहेर गावी राहतो. दलालांनी महिलेला लग्नासाठी तयार केलं. लग्नासाठी एक मुलगा देखील उभा करण्यात आला.

सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ

मुलगा फेरे घ्यायला आला नाही, त्यामुळे दलालांची पचाईत झाली. अशावेळी नातेवाईकानी आणि दलालांनी काही पैसे मिळवण्यासाठी थेट भावालाच लग्नासाठी गळ घातली. भाऊ आणि बहिणीने सात फेरे घेतले, त्यांची पती-पत्नी म्हणून सरकार दरबारी नोंद करण्यात आली. सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. अधिकाऱ्यांनी लग्नात देण्यात आलेल्या सर्व वस्तू परत घेतल्या आहेत. तसेत अनुदान म्हणून मिळणाऱ्या ३५ हजार रुपयांच्या रक्कमेवर स्थगिती आणली आहे.

लक्ष्मीपूरचे बीडीओ अमित मिश्रा यांनी सांगितलं की, ५ मार्च रोजी झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. यात भाऊ आणि बहिणीने सात फेरे घेतले आहेत. सुरुवातीच्या तपासानंतर त्यांना देण्यात आलेल्या वस्तू परत मागण्यात आल्या आहेत. अनुदान रोखण्यात आलं आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. याप्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

याआधीही अनेकदा झालीये फसवणूक

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. बलियामध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. २५ जानेवारीला ५३७ जोडप्यांचे सामूहिक विवाह झाले होते. यात अनेक जोडपे खोटे निघाले होते. अनेकांने आधीच लग्न झाले होते. काहींना पैसे देऊन आणण्यात आलं होतं. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात काही महिला स्वत:च हार घालताना दिसत आहेत. काही महिला स्वत:च कुंकू लावून घेत आहेत. याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकलचा खोळंबा, प्रवाशांचा संताप! मुंबईकडे जाणारी ट्रेन ४० मिनिटं लेट, बदलापूर स्टेशनवर उसळली गर्दी

अहिल्यानगर हादरलं! 'अपहरणानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार'; युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवलं, ती रडत हाेती अन्..

Kolhapur Politics : पंचायत समिती आरक्षण सोडतीवेळी प्रशासनाची चूक, माजी जिल्हा परिषद सदस्याचा बीपी झाला लो अन्...

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT