DELHI CM ARVIND KEJARIWAL 
देश

'आप' जिंकल्यास पंजाबला मोफत वीज; केजरीवालांचं आश्वासन

विनायक होगाडे

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यातच पंजाब विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. पंजाबच्या या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची 'आम आदमी पार्टी' पुढे सरसावली आहे. केजरीवाल यांनी नुकतेच पंजाबमध्ये सगळ्या जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. याच धर्तीवर आता त्यांनी पुढची घोषणा केली आहे. दिल्लीत यशस्वी ठरलेला मोफत वीजेचे वचन आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबसाठीही लागू केले. पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीत आपची सरशी झाल्यास पंजाबला मोफत वीज देऊ असे त्यांनी ट्विटरवरून जाहीर केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल उद्या चंडीगडला भेट देणार आहेत. त्यांनी पंजाबीत ट्विट केले आहे. त्यांनी महागाईमुळे पंजाबमधील महिलांनी आनंद गमावल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीत आम्ही प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत देतो. त्यामुळे महिला आनंदात आहेत. आपचे सरकार आल्यास ते पंजाबमध्ये वीज मोफत पुरवेल. उद्या तुमची भेट घेण्यास मी आतुर आहे.

दरम्यान, आपचे प्रवक्ते आणि दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयावर टीका केली. पूर्वनिश्चित ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याची परवानगी आपला नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला, मात्र मंगळवारी केजरीवाल चंडीगडमध्ये भव्य घोषणा करतील. त्यामुळे कॅप्टन (पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग) आणि त्यांच्या पक्षाला ४४० व्होल्टचा झटका बसेल, असे ट्विट त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT