Akhilesh Yadav Sakal
देश

सरकार आल्यास गरिबांवर मोफत उपचार; अखिलेश यादव

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास गरिबांवर मोफत उपचार केले जातील तसेच वृद्ध आणि विधवांना निवृत्तिवेतन तिप्पट दिले जाईल.

पीटीआय

लखनौ - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास गरिबांवर मोफत उपचार केले जातील तसेच वृद्ध आणि विधवांना निवृत्तिवेतन तिप्पट दिले जाईल, असे आश्‍वासन आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिले. आगामी निवडणुकीत मतदार भाजपचा सफाया करतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

हरडोईच्या संडिला येथे महाराज सल्हीय अर्कवंशी यांच्या मूर्ती स्थापना दिवसानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अखिलेश म्हणाले की, आम्ही आताच काही योजना सांगणार नाही. कारण भाजपकडून त्याची नक्कल होऊ शकते. आमच्या मातांना आणि बहिणींना सध्या पाचशे रुपये मिळतात. सध्याची महागाई पाहता ही रक्कम खूपच कमी आहे. यूपीत समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास ही रक्कम तीन पटीने वाढवली जाईल. भाजपने राज्यातील लाखो लोकांना नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. किती जणांना रोजगार मिळाला, हे सर्वांनाच ठावूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Puran Kumar: देश हादरला! IPS ऑफिसरने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर..

Jayant Patil Sangli : जयंत पाटलांना मोठा धक्का! आमदार अरूण लाड यांचे चिरंजीव भाजपमध्ये, चंद्रकांत दादांचे मिशन झेपी, पदवीधर

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळावर दाखल

कांतारा फेम रुक्मिणी वसंतचे वडिल 'उरी' युद्धात झालेले शहिद, अशोक चक्र पुरस्काराने झालेला सन्मान

Shiv Sena Party Symbol Hearing : निवडणुका तोंडावर आणि पुन्हा मिळाली पुढची तारीख, शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवेळी नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT