Rape Sakal
देश

मैत्रीण आहे म्हणजे ती तुमच्या लैंगिक वासनेसाठी उपलब्ध असते, असं नाही: POCSO कोर्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : विशेष पोक्सो (Protection of Children from Sexual Offences - POCSO) कोर्टाने एका खटल्याच्या निकालामध्ये एक महत्त्वाचं विधान केलंय. कोर्टाने म्हटलंय की, एखाद्याला विरुद्ध लिंगी मित्र अथवा मैत्रिण आहे, याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या लैंगिक इच्छा आणि वासना (sexual desire) पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे, असा होत नाही.

या विेशेष कोर्टाने एका 20 वर्षांच्या तरुणाला त्याच्या 13 वर्षांच्या मैत्रीणीवर आणि दूरच्या नातेवाईकावर बलात्कार केल्याबद्दल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यामुळे या आरोपीने त्या मुलीचं तर आयुष्य उद्ध्वस्त केलंयच शिवाय या गुन्ह्यामुळे इतक्या कमी वयात आरोपीने स्वत:चं देखील आयुष्य उद्ध्वस्त केलंय.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, स्पेशल जज प्रिती कुमार घुले यांनी म्हटलंय की, या आरोपीला दिलेल्या या शिक्षेने आरोपीच्या वयोगटातील आजच्या तरुणांना असा संदेश देता येईल की, वासनेच्या तृप्तीसाठीची अशी अनियंत्रित इच्छा त्यांचे स्वत:चे भविष्य, करिअर आणि प्रगतीचा महत्त्वाचा असा काळ उद्ध्वस्त करु शकते."

कोर्टाने पुढे म्हटलंय की, तरुणांच्या भविष्यातील प्रगतीचा पाया हा त्यांच्या तरुणावस्थेच्या सुरुवातीच्याच दिवसांमध्येच आहे. सध्याच्या या प्रकरणात आरोपीने केलेल्या गुन्ह्यामुळे स्वत: आरोपीचे तसेच या गुन्ह्यातून वाचलेल्या व्यक्तीचेही भविष्य अंधाराच्या छायेत आलं आहे, असं न्यायाधीशांनी म्हटलंय.

आरोपीला त्याच्या या कृत्याचा काय परिणाम झाला आहे, ते समजलं आहे, असं नमूद करून कोर्टाने म्हटलंय की, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची गरज नाहीये. पुढे म्हटलंय की, या गुन्ह्यातील अल्पवयीन वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांअंतर्गत नुकसानभरपाई मिळू शकते. आणि पुढे कोर्टाने नमूद केलंय की, दोषीच्या या कृत्यामुळे त्या अल्पवयीन मुलीच्या लग्नात अडथळे येण्याची शक्यता आहे, कारण तिची प्रतिबद्धता आधीच तुटलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Shrigonda Drowning: पोहताना वडिलाचा मृत्यू,९ वर्षीय मुलगा बचावला; श्रीगोंदे तालुक्यातील घटना, युवकाने जीव धाेक्यात घातला,थरारक घटना!

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

SCROLL FOR NEXT