संग्रहित छायाचित्र sakal
देश

भारत बंद | बँकांच्या युनियनपासून ते विरोधकांचा संपाला पाठिंबा

बँक युनियनपासून विरोधकांनी 'भारत बंद'ला पाठिंबा दिला आहे.

ओमकार वाबळे

दिल्लीत शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी उद्या (सोमवारी) देशभरात भारत बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. याला पाठिंबा देण्यासाठी बँक युनियनपासून सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.

हा बंद सकाळी 6 ते संध्याकाळी 4 या वेळेत होणार असून त्या दरम्यान सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये बंद असतील. तसेच शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि सार्वजनिक कार्यक्रम बंद राहणार आहेत.

राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर तीन शेतकरी कायदे अस्तित्वात आले. यानंतर दिल्लीच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र जमले होते. या आंदोलनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला राजकीय पक्षांसह समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळाला आहे.

पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी देशव्यापी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू सरकारनेही देशव्यापी संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसनेही सोमवारी निदर्शनांमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT