cowin app esakal
देश

लसीकरण : १ जानेवारीपासून मुलांना CoWIN वर करता येणार नोंदणी

१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारीपासून लसीकरण सुरु होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशाता आता १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण (Child Vaccination) सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) याची नुकतीच घोषणा केली. यासाठी या मुलांना १ जानेवारी २०२२ पासून CoWIN पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे, CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा (Dr. R. S. Sharma) यांनी ही माहिती दिली. (From January 1 children will be able to register on CoWIN for Covid vaccination)

डॉ. शर्मा म्हणाले, "१५ ते १८ वयोगटातील मुलं १ जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी १० वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं. त्यामुळं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे"

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी (२५ डिसेंबर) रात्री देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लसीकरणासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या. ख्रिसमस (Christmas) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी नागरिकांना दिलेली ही भेट आहे. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच १० डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT