dharwad crime 
देश

'मला एकदा संपवून टाका', कर्नाटकात मुस्लीम फळविक्रेत्याला श्रीराम सेनेकडून मारहाण

सकाळ डिजिटल टीम

धारवाड : कर्नाटकातील धारवाड शहरातील हनुमान मंदिराबाहेर मुस्लिम फळ विक्रेत्यांना त्रास देण्यात आला. श्रीराम सेना गटाच्या सदस्यांनी मुस्लिम फळविक्रेतेची गाडी उलटवली आणि फळे रस्त्यावर फेकली आहेत. कर्नाटकातील काही हिंदू संघटनांनी फळांच्या व्यापारातील 'मुस्लिमांची मक्तेदारी' संपवण्याची मागणी केली आहे.

मुस्लिम फळ विक्री त्याला हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून फळांचे नुकसान केले आहे. तब्बल पाच क्विंटल फळांची नासधूस करून मुस्लीम व्यक्तीला हिंदू संघटनेन मारण केली आहे. बाजारपेठेत मुस्लिमांना फळांचे ठेले लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कर्नाटकात हिजब वादानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुस्लीम दुकानदारावर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसापासून हिंदू-मुस्लीम वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे.

शिवशाहीच राज्य म्हणून आम्हाला हिंदू संघटना त्रास देत आहेत. हिंदू संघटनांनी आम्हाला मारहाण करून आमच्या फळांचं खूप मोठे नुकसान केले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल मुस्लिम फळ विक्रेत्यांनी केला आहे. आम्ही या मारहाणीची तक्रार करायला गेल्यास आमच्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्ही कोणती तक्रार दिली नाही, असेही मुस्लिम सांगितलं. गेल्या महिनाभरापासून मुस्लिम बांधवांना या हिंदू संघटनांचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे कुठं तरी थांबव अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

श्रीराम सेनेन धारवाडमधील मंदिराजवळ मुस्लिम विक्रेत्याच्या गाडीची तोडफोड केलीय. माध्यमांशी संवाद साधताना मुस्लिम विक्रेता म्हणाला, मला एकदा संपून टाका त्याशिवाय हा वाद मिटणार नाही असं उद्विग्न होऊन त्यांना हिंदू संघटनेचा निषेध नोंदवला आहे. आम्ही दिवसभर काबाडकष्ट करून फळ विकत असतो, पण हे लोक आम्हाला मारहाण करत आहेत हे कुठेतरी थांबायला हवं, असे तो रडत म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT