देशात कोरोना महामारी (corona pendemic) थैमान घालत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असताना सोशल मीडियावरील काही पोस्ट लोकांना खळखळून हसवत आहेत.
नवी दिल्ली- देशात कोरोना महामारी (corona pendemic) थैमान घालत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असताना सोशल मीडियावरील काही पोस्ट लोकांना खळखळून हसवत आहेत. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पोस्टमधील शेअर केलेला फोटो जितका मजेशीर आहे, त्यापेक्षा अधिक याला दिलेलं कॅप्शन जबरदस्त आहे. ही पोस्ट आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा(dipanshu kabra) यांनी शेअर केली आहे. त्यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे. (funny answer given police ips dipanshu kabra shop shutter poster)
दिपांशू काबरा यांनी एक फोटो शेअर केलाय, ज्यात दिसतंय की एका दुकानाच्या शटरवर एक सूचना लिहिण्यात आलीये. 'माझ्या दुकानंचं शटर बंद दिसलं तर संपर्क करा, आम्ही आत्म्यासारखं आसपासच भटकत आहोत', असं त्यावर लिहिण्यात आलंय. ही सूचना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. यावर पोलिस अधिकारी दिपांशू काबरा यांनी गंमतीदार उत्तर दिलं आहे. या भटकत्या आत्म्याची पोलिसांसोबत लवकरच भेट होईल, असं ते म्हणाले. त्यांच्या उत्तराला मोठी दाद मिळताना दिसत आहे. दिपांशु काबरा यांची पोस्ट अनेकांनी लाईक आणि रिट्विट केली आहे. अनेकांनी यावर गंमतीशीर कमेंट केले आहेत. आता या भटकत्या आत्म्याचं काही खरं नाही, असं एका नेटकऱ्यानं म्हटलंय.
कोरोनाच्या संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. व्यावसायीकांवर दुकानं उघडी ठेवण्यावर निर्बंध आले आहेत. असे असले तरी अनेक दुकानदार विविध मार्गांनी शक्कल लढवताना दिसताहेत. त्याचीच प्रचिती दुकानावर लावण्यात आलेल्या या सूचनेमुळे आली. पण, पोलिसांनी याला दिलेलं उत्तरही भन्नाट आहे. दिपांशु काबरा यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. आतापर्यंत या पोस्टला 22 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलंय, तर हजार लोकांनी यावर कमेंट केलंय. नेटकऱ्यांच्या या कमेंट वाचनीय आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.