देश

वरमाला घालताना निसटली नवरदेवाची पँट; नवरीलाही झालं हसू अनावर

भर मांडवात नवरदेवाचं झालं हसू; पाहा video

शर्वरी जोशी

लग्नसमारंभात (wedding) अनेकदा असे काही भन्नाट किस्से घडत असतात जे आजन्म साऱ्यांच्याच लक्षात राहतात. बऱ्याचदा हे किस्से आठवून आपण हसतो आणि लग्नातील तो सारा सीन डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र, सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असतो. त्यामुळे असे काही मजेशीर किस्से घडले की लगेच ते कॅमेरा कैद होतात. त्यामुळ हे मजेशीर किस्से आठवण्यासोबतच पुन्हा एकदा पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. नववधूला वरमाला घालण्यासाठी नवरदेव इतका उतावळा झाला होतो. की, आपली पँट निसटली हेदेखील त्याला समजलं नाही. त्याच्या या वेंधळेपणामुळे केवळ वऱ्हाडीच नव्हे तर नववधूदेखील खो-खो करुन हसू लागली. (funny-video-of-wedding-viral-video-of-groom-pants-came-off)

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या व्हिडीओमध्ये एक नवरदेव मोठ्या थाटात नववधूला वरमाला घालतो आणि आनंदाच्या भरात वऱ्हाड्यांकडे पाहत असतो. त्याच वेळी त्याची पँट निसली आणि ती खालती आली. विशेष म्हणजे आपली पँट सुटली आहे. याची जराही कल्पना त्याला नव्हती. मात्र, शेवटी न राहावून लाजेखातर वधूनेच त्याला पँट निसटल्याचं सांगितलं.

दरम्यान, नवऱ्याची पँट भर मांडवात निसटल्यामुळे या वधूलादेखील हसू अनावर झालं आणि ती जोरजोरात हसू लागली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT