delhi g-20 summit india development narendra modi politics sakal
देश

G-20 Summit in Delhi: कोण आहेत भारताचे शेरपा? कोणाकडे असते ही जबाबदारी आणि यांचं काम काय असतं?

जी - २० मध्ये शेरपाची भूमिका महत्त्वाची ठरते. बहुतांश वेळा अशा लोकांना शेरपा बनवलं जातं, ज्यांना राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही प्रकारच्या कामाची समज आहे.

वैष्णवी कारंजकर

जी - २० देशांचं शिखर संमेलन ९ आणि १० सप्टेंबर रोजी भारतेच्या अध्यक्षतेखाली दिल्ली इथं होणार आहे. या संमेलनासाठी दिल्ली आता पूर्णपणे नटली आहे. परदेशी पाहुण्यांचं आगमन होण्यासही आता सुरुवात झाली आहे. जी २० चा मूळ हेतू आर्थिक सहकार्य आणि स्थिरता प्रस्थापित करण्याचा आहे. पण काळासोबत, व्यापार, शाश्वत विकास, आरोग्य, कृषी, भ्रष्टाचार विरोधी कार्य हे विषयही यात सामील करण्यात आले.

या बैठकीमध्य दोन पद्धतीने चर्चा होते. एक म्हणजे फायनान्शियल आणि दुसरं म्हणजे शेरपा ट्रॅक. शेरपा ट्रॅकचं नेतृत्त्व सरकारतर्फे नियुक्त केलेले लोक करतात. भारताचे शेरपा अमिताभ कांत हे आहेत.

कोणाला शेरपा म्हणून नियुक्त केलं जातं?

जी - २० मध्ये शेरपाची भूमिका महत्त्वाची ठरते. बहुतांश वेळा अशा लोकांना शेरपा बनवलं जातं, ज्यांना राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही प्रकारच्या कामाची समज आहे. अमिताभ कांत यांच्या आधी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे भारताचे शेरपा होते. पण त्यांना वेळ मिळत नसल्याने अमिताभ कांत यांना भारताचे शेरपा म्हणून नियुक्त करण्यात आलं. अमिताभ कांत हे केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते उद्योगनीती आणि संवर्धन विभागामध्ये सचिव होते. ते ६ वर्षे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही होते. याशिवाय कोरोना काळामध्ये एम्पावर्ड गृप ३ चा ते भाग होते.

शेरपाचं काम काय असतं?

जी-२० संमेलनामध्ये दोन समांतर पद्धतीने चर्चा होते. एक म्हणजे आर्थिक आणि दुसरं म्हणजे शेरपा ट्रॅक. फायनान्शियल ट्रॅकमध्ये चर्चेचं काम अर्थमंत्री आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर करतात आणि शेरपा ट्रॅकमध्ये हे काम शेरपा करतात. फायनान्शियल ट्रॅक थेट फायनान्स क्षेत्रात काम करतात. पण शेरपा ट्रॅकचं काम थोडं किचकट असतं. शेरपा सदस्य देशांच्या शेरपांसोबत सहकार्याने राजकीय तसंच अन्य मुद्द्यांवर चर्चा करतात, बैठका करतात आणि वेळोवेळी आपल्या प्रमुखांना याची माहिती देतात.

जी २० कृतीगटांसोबत समन्वय ठेवण्याचं काम शेरपा करतात. शिखर परिषदेसाठी १३ कृती गट तयार करण्यात आले आहेत.

शेरपा हा शब्द कुठून आला?

प्रशासकीय सेवांमध्ये शेरपा या शब्दाचा वापर बऱ्याचदा केला जातो. शेरपा शब्द हा नेपाळ आणि तिबेटच्या गाईड्ससाठी वापरला जातो. हे गाईड गिर्यारोहकांना मार्ग दाखवतात. हे शेरपा हिमालयामध्ये राहतात आणि जिथे ऑक्सिजन कमी असतो, अशा उंचावरच्या जागीही ते पोहोचू शकतात. जी-२० मध्ये भारताच्या वतीने या आधी माँटेक सिंह अहलुवालिया, शशिकांत दास, अरविंद पनगढिया, सुरेश प्रभू, पीयूष गोयल हे शेरपा होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manmad News : मनमाड कृषी बाजार समितीतील अविश्वास ठराव फेटाळला; दीपक गोगड यांना दिलासा

Pimpri-Chinchwad Update : सायकल चालवा; कोंडी फोडा, प्रदूषण हटवा! ‘स्मार्ट सिटी’त पालिकेकडून ‘स्टार्ट अप’ने मुहूर्तमेढ

Punawale Traffic Jam : ‘एमएनजीएल’ वाहिनी फुटून वायुगळती, हजारो ग्राहकांना फटका; पुनावळे भुयारी मार्गाजवळ तीन तास कोंडी

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयांऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

PMC News : पांडवनगरमधील दीड हजार रहिवासी धोक्यात; महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत झाडं घरात!

SCROLL FOR NEXT