Air Force One  
देश

G20 Summit: जगातील सर्वाधिक सुरक्षित विमानाने जो बायडेन आलेत भारतात, जाणून घ्या का आहे अभेद्य

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन जी-२० परिषदेसाठी शुक्रवारी भारतात दाखल झाले. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक पार पडली. बायडेन अध्यक्ष बनल्यापासून पहिल्यांदाच भारतात आले आहेत. जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे अक्ष्यक्ष म्हणून त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. ते ज्या विमानातून भारतात दाखल झाले ते विमानही अत्यंत खास आहे. (president Joe Biden Lands In Delhi In World Safest Plane)

बायडेन यांनी खास विमान एअरफोर्स-१ मधून दिल्लीत लँड केले. अमेरिकी अध्यक्ष ज्या देशात जातात, तेथे कडक सुरक्षा प्रोटोकॉल फॉलो केला जातो. बायडन एकूण दोन एअरफोर्स-१ घेऊन प्रवास करतात. त्यातील एक भारतात लँड झाले आहे, तर दुसरे अज्ञात ठिकाणी आपत्कालीन स्थितीसाठी ठेवले आहे. या विमानामध्ये ऑफिसमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा असतात.

डॉक्टरची टीम

जो बायडेनच्या एअरफोर्स-१ विमान बोईंट 747-200B सिरिजचे आहे. यामध्ये हॉस्पिटल, ऑफिस, किचन अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. यात तीन फ्लोअर असतात. याचे एकूण क्षेत्रफळ ४ हजार वर्गफूट आहे. एअरफोर्समध्ये १०२ लोक प्रवास करु शकतात. विमानामध्ये हॉस्पिटल असून डॉक्टरची टीम सदैव तत्पर असते.

अणुबॉम्ब हल्ल्यापासून सुरक्षा

लोकांच्या आरामासाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत. एअरफोर्स एका वेळेस १२ हजार किमी प्रवास करु शकते. हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सुविधा देखील याच्यामध्ये आहे. कोणत्याही हल्ल्यापासून वाचण्यासाठी एअरफोर्समध्ये यंत्रणा आहेत. विमानावर मिसाईल हल्ला करण्यात आला, तर एअरफोर्स-१ त्याला प्रत्युत्तर देऊ शकतं. अणुबॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठीही यात उपाययोजना आहेत.

आपात्कालीन स्थितीत एअरफोर्स-१ काही मिनिटात लँडिग करु शकते. एअरफोर्स-१ उड्डाण करण्यापूर्वी एक कार्गो विमान उड्डाण करते. यामध्ये अमेरिकी हवाईदलाचे हेलीकॉप्टर, राष्ट्रपतींची अभेद्य कार, शस्त्र आणि सुरक्षा कर्मचारी असतात. अध्यक्षांच्या सुरक्षा प्रोटोकॉल तीन स्तरामध्ये असतो. प्रवासाचा मार्ग, धोक्याची शक्यता आणि हॉटेलमधील सुरक्षा यांचा समावेश असतो.

कमांड कंट्रोल सेंटर

अमेरिकी अध्यक्ष जेथे जातात, तेथे एक कमांड कंट्रोल सेंटर उभारलं जातं. एअरफोर्स-१ चा मार्ग आणि वेळ गुप्त ठेवले जाते. अध्यक्ष जेथे थांबतात, त्या जागेचा पूर्ण ताबा अमेरिकी सुरक्षा एजेन्सी घेते. हॉटलमध्ये जास्तीत जास्त खोल्या बूक केल्या जातात. राष्ट्राध्यक्ष जेथे थांबणार आहेत, तेथील सर्व इलेक्टॉनिक उपकरणे बदलले जातात. खोली पूर्ण बुलेटप्रूफ केली जाते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT