CE-20 cryogenic engine ready sakal
देश

Gaganyaan Mission : ‘गगनयान’साठी क्रायोजेनिक इंजिन सज्ज; जमिनीवरील सर्व चाचण्या यशस्वी

भारताच्या ‘गगनयान’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिन आता सज्ज झाले आहे.

पीटीआय

बंगळूर - भारताच्या ‘गगनयान’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिन आता सज्ज झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एलव्हीएम-३ या प्रक्षेपकासाठी विकसित केलेल्या ‘सीई-२०’ या क्रायोजेनिक इंजिनाच्या जमिनीवर करण्याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. यामुळे ‘गगनयान’ मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ‘इस्रो’ने पार केला आहे.

‘इस्रो’ने ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. ‘सीई-२० हे क्रायोजेनिक इंजिन ‘गगनयान’ मानवी मोहिमांसाठी सज्ज केले आहे. जमिनीवरील सर्व चाचण्यांमध्ये ते यशस्वी झाले असून, गगनयानाच्या पहिल्या उड्डाणासाठी ते ‘एलव्हीएम ३ जी १’ म्हणून ओळखले जाईल. गगनयानाचे पहिले चाचणी उड्डाण हे मानवविरहित असेल,’ असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.

‘इस्रो’च्या महेंद्रगिरी येथील प्रोपल्शन कॉम्प्लेक्समधील हाय अल्टिट्यूड टेस्ट फॅसिलिटीमध्ये १३ फेब्रुवारीला या इंजिनाची अंतिम चाचणी घेण्यात आली. व्हॅक्यूम इग्निशन चाचण्यांच्या मालिकेतील ही सातवी चाचणी असल्याचे ‘इस्रो’ने सांगितले आहे.

मानवी मोहिमांसाठी ‘सीई-२०’ हे इंजिन सुरक्षित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. क्रायोजेनिक इंजिनाच्या प्राथमिक चाचण्यांबरोबरच सर्वच स्तरांतील त्याची क्षमता तपासण्यात आली. तसेच आव्हानात्मक स्थितीत इंजिनाची कार्यक्षमताही पडताळली गेली. गगनयान मोहिमेतील जमिनीवरील सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे ‘इस्रो’ने म्हटले आहे.

अशा झाल्या चाचण्या

  • मानवी सुरक्षेसाठी पात्र ठरावे म्हणून, चार ‘सीई २०’ इंजिनांची वेगवेगळ्या परिस्थितीत विविध चाचण्या घेण्यात आल्या

  • पात्रतेसाठी इंजिनाचे सहा हजार ३५० सेकंदांसाठी यशस्वीपणे प्रज्वलन होणे गरजेचे होते

  • ‘सीई २०’ इंजिनाच्या ३९ हॉट फायरसाठी तब्बल आठ हजार ८१० सेकंदांच्या चाचण्या घेण्यात आल्या

  • गगनयान मोहिमेसाठी फ्लाइट इंजिनच्या स्वीकृती चाचण्या यशस्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT