Rajasthan Crime News esakal
देश

संतापजनक! बोलेरो कारमधून नेऊन मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार

नराधमांनी मुलीचा गळा दाबून तिला वनविभागाच्या परिसरात नेलं आणि तिथं त्यांनी सामूहिक बलात्कार केला.

सकाळ डिजिटल टीम

नराधमांनी मुलीचा गळा दाबून तिला वनविभागाच्या परिसरात नेलं आणि तिथं त्यांनी सामूहिक बलात्कार केला.

बाडमेर जिल्ह्यात (Barmer District) मूकबधिर दलित मुलीवर (Dalit Girl) सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. नराधमांनी मुलीला बोलेरो कारमधून (Bolero Car) नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या वडिलांनी धोरीमन्ना पोलीस ठाण्यात (Dhorimanna Police Station) तक्रार केली आणि सांगितलं की, आमची मूकबधिर मुलगी संध्याकाळी एमआरटी रोडजवळील शेतात शेळ्या चारत होती. यादरम्यान बोलेरो कारमधून आलेल्या नराधमांनी मुलीचा गळा दाबून तिला जवळच्या वनविभागाच्या परिसरात नेलं आणि तिथं नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलगी बेशुद्ध पडताच नराधम तेथून पळून गेले.

पीडित मुलगी घरी न पोहोचल्यानं नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. रक्तबंबाळ आणि बेशुद्ध अवस्थेत मुलगी वनविभागाच्या परिसरात नातेवाईकांना आढळली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला धोरीमन्ना येथील सामूदायिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी रात्री उशिरा पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भार्गव यांनी सांगितलं की, पीडितेची आज मेडिकल तपासणी केली जाईल. यासोबतच श्वानपथकासह पोलिस पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. अज्ञात नराधमांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chimpanzee War: ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ खरे ठरले! चिंपांझींचं रक्तरंजित युद्ध; मित्र झाले वैरी, २८ जणांचा अंत, जंगलात हाहाकार! कारण काय?

Pune Metro: विस्तारित मेट्रो मार्गांसाठी दमदार पावले! पुण्यातील शिवाजीनगर स्थानकाला लवकरच प्रारंभ, भूसंपादनाचे प्रस्ताव दाखल

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून पटपडताळणी, २९३५ शाळांचा समावेश

forest Department: आता हमीपत्र द्यावे लागणार! वन्यप्राणी प्रगणनेला जाताय का?...सावधान; अनुचित घटनेला सहभागी होणारा राहील जबाबदार..

Kolhapur CPR Red Diary Case : कोल्हापुरात आरोग्य विभागात खळबळ! CPR 'लाल डायरी' प्रकरणी मोठी कारवाई; डॉ. वाडीकरांसह डॉ. सुप्रिया देशमुख यांचे निलंबन

SCROLL FOR NEXT