Sanjeev Jeeva 
देश

Sanjeev Jeeva Assassination: मुख्तार अन्सारीला इशारा? जवळच्या सहकाऱ्याची हत्या! यूपीच्या कोर्टात घडला थरार

महिन्याभरापूर्वी अतिक अहमद या माफियाची काही तरुणांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : माफीया आणि राजकारणी बनलेल्या आतिक अहमद याला महिनाभरापूर्वी काही तरुणांनी पोलिसांसमोरच गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर आता आणखी एका गँगस्टरची हत्या झाली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील कोर्टात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. (Gangster Sanjeev Jeeva shot dead by unknown assailants outside a Lucknow court)

लखनऊ कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या तुरुंगात असलेल्या गँगस्टर मुख्तार अन्सारीचा संजीव जीवा हा जवळचा सहकारी होता. जीवाची बुधवारी सकाळी कोर्टाच्या आवारात हत्या करण्यात आली.

या घटनेची माहिती देताना जिल्हादंडाधिकारी सुर्यपाल गंगवार यांनी सांगितलं की, "संजीव जीवा या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये हल्ल्यात त्याला मृत घोषीत करण्यात आलं आहे. ही घटना घडली त्यावेळी तिथं एक लहान मुलगी देखील होती, ती यात जखमी झाली असून तिला केजीएमयू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे"

आरोपींनी वकिलाच्या पेहरावात येऊन झाडल्या गोळ्या

आरोपींनी वकिलाच्या पेहरावात येऊन भर कोर्टात गोळ्या झाडल्या. यामुळं एकच खळबळ उडाली. यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जौनपूर इथल्या केराकतचा निवासी विजय यादव असं त्याचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT