लखनौ : उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा गुंड विकास दुबेच्या खास माणसाचा पोलिसांनी खात्मा केला आहे. अमर दुबे असे या गुंडाचे नाव आहे. आज (ता. ०८) बुधवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेचा खात्मा केला आहे. अमर दुबे एक फरार आरोपी होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आठ पोलिसांची गोळीबार प्रकरणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली होती. यामध्ये अमर दुबेचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं. दरम्यान विकास दुबे पुन्हा एकदा पोलिसांच्या हातून निसटला असून मुख्य आरोपी असणारा विकास दुबे हरियाणामधील फरिदाबाद येथील एका हॉटेलमध्ये पाहण्यात आल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे.
काल (ता. ०७) मंगळवारी पोलिसांनी फरिदाबाद येथील हॉटेलवर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. चौकशी केली असता पोलिस पोहोचण्याआधीच विकास दुबेने हॉटेलमधून पळ काढला असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून पाहिलं असता त्यामध्ये विकास दुबेसारखा दिसणारी व्यक्ती दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणामधील फरिदाबाद आणि गुडगाव येथे हाय अलर्ट जारी केला असून विकास दुबे राजधानी दिल्लीत आत्मसमर्पण करेल असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.