LPG Gas esakal
देश

LPG Gas : देशातील भगिनींना मोदींचं रक्षाबंधन गिफ्ट! घरगुती सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त, तर उज्ज्वला...

संतोष कानडे

नवी दिल्लीः मोदी सरकारने देशातील भगिनींना रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर २०० रुपयांची सूट दिलेली आहे. तर उज्ज्वला योजनेच्या सिलिंडरवर ४०० रुपयांची सूट देण्यात आलीय.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ७५ लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकाही डोळ्यासमोर आहेत. त्या अनुषंगाने केंद्राने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केलं होतं. त्यानुसार आता गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. देशात विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ही आघाडी एकजुटीने मोदी सरकारला निवडणुकीत तोंड देणार आहे. विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला जाब विचारणार असल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यापासून घरगुती वापराचा गॅस स्वस्त होणार असून सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपयांची कपात सरसकट लागू करण्यात आलीय. तर उज्ज्वला योजनेचं कनेक्शन ज्यांच्याकडे आहे त्यांना ४०० रुपयांची सूट मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT