Gautam Adani  Sakal
देश

Gautam Adani : गौतम अदानींनी सांगितले आयुष्यातले तीन महत्त्वाचे टप्पे; टीकाकारांना दिलं सणसणीत उत्तर

संतोष कानडे

नवी दिल्लीः उद्योजक गौतम अदानी यांनी इंडिया टीव्हीला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. अदानींच्या उद्योग भरभराटीला मोदींची जवळीक असल्याचा आरोप होतो. परंतु ते तसं नसल्याचं स्पष्टीकरण गौतम अदानी यांनी दिलं.

"मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मोदीजींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही... तुम्ही त्यांच्याशी धोरणाबद्दल बोलू शकता, देशहितासाठी चर्चा करू शकता, पण जे धोरण तयार केलं जातं ते प्रत्येकासाठी आहे, ते एकट्या अदानी समूहासाठी नाही, असही अदानी म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी क्रोनी कॅपिटलिझमबाबत केलेल्या आरोपावर अदानी म्हणाले की, तो राजकारणाच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे, असे मला वाटते.

ते पुढे म्हणाले की, ज्या-ज्या राज्यांमध्ये शक्य आहे तिथे अधिकाधिकाक गुंतवणूक व्हावी, हे आमचं धोरण आहे. अदानी ग्रुप २२ राज्यांमध्ये काम करत आहे, याचा आम्हांला आनंद आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही. त्यामुळे कुणाच्याच आरोपांत तथ्य नाही.

आयुष्यातील वळणांवर केलं भाष्य

गौतम अदानी म्हणाले की, माझ्या जीवनात तीन मोठे ब्रेक मिळाले. पहिला ब्रेक १९८५ मध्ये जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते आणि नवीन आयात-निर्यात धोरण आलं. आमची कंपनी एक ग्लोबल ट्रेडिंग हाऊस बनली. दुसरा ब्रेक १९९१ मध्ये जेव्हा पीव्ही नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. त्यावेळी आम्ही पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप करु शकलो. त्यामुळे देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरला दिशा मिळाली. तिसरा ब्रेक, जेव्हा मोदी १२ वर्षे मुख्यमंत्री होते तेव्हा. तो अनुभव चांगला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

Krishnaraj Mahadik Political Journey : स्पोर्ट्समन, युट्यूबर ते राजकारणी खासदार धनंजय महाडिक पुत्र कृष्णराजचा राजकीय प्रवास

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT