Gautam Gambhir Congratulates PM Modi and HM Shah for Citizen Amendment Bill:
Gautam Gambhir Congratulates PM Modi and HM Shah for Citizen Amendment Bill:  
देश

माझे आजोबाही पाकिस्तानातून आलेले, इथे त्यांना सन्मान मिळाला : गंभीर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बहुमतात नसलेल्या राज्यसभेतील सुमारे सात तासांच्या वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती-2019 या बहुचर्चित विधेयकाला वरिष्ठ सभागृहाने आज रात्री बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते पडली. त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. तसेच पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

गंभीरने ट्विट करत मोदी आणि शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ''माझे आजोबा 1947मध्ये फाळणीच्यावेळी मुलतानवरुन दिल्लीला आले होते. त्यांना या देशात सन्मान आणि यश मिळाले. या विधेयकामुळे आता देशात दलितांना कोणतीच अडचण येणार नाही अशी माझी आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माझ्या शुभेच्छा.''

शेजारच्या तीन देशांतील हिंदूंसह अल्पसंख्यांक शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देण्याबाबतचे हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून, भाजपने येथे बहुमत नसले तरी कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी त्याचा अडसर येत नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिले. नागरिकत्व कायद्यात ही दहावी दुरुस्ती आहे. यापूर्वी श्रीलंकेतील तमीळ निर्वासितांसह विविध देशांच्या शरणार्थींसाठी यात दुरुस्त्या केल्या गेल्या होत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT