देश

पंतप्रधानांनी बिपीन रावत यांच्यासह 12 जणांच्या पार्थिवाला वाहिली श्रद्धांजली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सीडीएस जनरल बीपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत तसेच इतर 12 जणांचे पार्थिव दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 9 वाजता या मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. या शोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्या दुपारी रावत यांच्यासह इतर पार्थिवांवर अत्यंसंस्कार होणार आहेत.

दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी बंगळूरमध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. वरुण सिंग यांची प्रकृती सध्या गंभीर पण स्थिर असून त्यांना आराम पडावा म्हणून सर्वस्तरांतून प्रार्थना करण्यात येत आहे. वरुण यांच्यावर आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. वृत्तसंस्थेशी बोलताना वरुण यांचे वडील कर्नल के.पी.सिंग (निवृत्त) म्हणाले की,‘‘ मी सध्या वेलिंग्टनमध्ये पोचलो असलो तरीसुद्धा वरुणला मात्र बंगळूरमध्ये हलविण्यात आले आहे.’’ के.पी.सिंग हे मध्यप्रदेशातील भोपाळ येथे वास्तव्यास असतात. वरुण यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘‘ मी याबाबत आताच काहीही खात्रीने सांगू शकत नाही पण यातून देखील तो सावरेल याचा मला विश्वास आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

Kalamba Pothole Death : कोल्हापुरात खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! नातेवाइकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून नोंदवला महापालिकेचा निषेध; सोनार काम करणाऱ्या कुटुंबाचा हरपला आधार

SCROLL FOR NEXT