General Rawat was accorded a 17 gun salute ANI
देश

...म्हणून सीडीएस बिपीन रावत यांना देण्यात आली 17 तोफांची सलामी

तोफांची सलामी देण्याची परंपरा भारतामध्ये ब्रिटिश काळात सुरू झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat Died In Helicopter Crash ) यांचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ (IAF Helicopter Crash Near Kunnur) झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात (Bipin Rawat Helicopter Crash ) मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. (CDS Bipin Rawat funeral In Delhi) सर्वसाधारणपणे आपल्या देशात 21 आणि 17 तोफांची सलामी दिली जाते. मात्रा, रावत यांच्या पार्थिवाला 17 तोफांची सलामी देण्यात आली. बिपीन रावत यांना 17 तोफांची सलामी का देण्यात आली यामागचे कारण आपण जाणून घेऊया. (General Rawat was accorded a 17-gun salute at his funeral)

कुणाला देण्यात येते 17 तोफांची सलामी

17 तोफांची सलामी ही हाय रँकचे लष्करी अधिकारी, नेव्हल ऑपरेशन्सचे प्रमुख आणि लष्कर आणि हवाई दलाच्या चिफ ऑफ स्टाफ यांना दिली जाते. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनाही 17 तोफांची सलामी दिली जाते. भारतात अनेक प्रसंगी राष्ट्रपती, सैनिकी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या अंत्यसंस्कारावेळी 21 तोफांची सलामी दिली जाते.

अशी झाली सुरुवात

21 तोफांची सलामी देण्याची प्रथा ही 14 व्या शतकामध्ये सुरू झाली. त्या काळात जेव्हा कुठल्याही देशाचे सैन्य समुद्री मार्गामधून कुठल्याही देशामध्ये जात असे, तेव्हा किनाऱ्यावर 7 तोफा डागल्या जात असत. या माध्यमातून आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, असा संदेश दिला जात असे. तसेच जहाजांवर सुद्धा 7 तोफा असत, कारण 7 आकडा हा शुभ मानला जात असे.

भारतात कधी झाली सलामी देण्याची परंपरा

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान आणि कॅनडासह जगातील सर्व देशांमध्ये राष्ट्रीय दिनी 21 तोफांची सलामी देण्याची परंपरा आहे. भारतामध्ये राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी देण्याची परंपरा आहे. तोफांची सलामी देण्याची परंपरा भारतामध्ये ब्रिटिश काळात सुरू झाली होती. त्या काळात ब्रिटिश सम्राटाला 100 तोफांची सलामी दिली जात असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT