Arvind Kejriwal arrested esakal
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीचं स्टेटमेंट; भारताचा संताप, परराष्ट्र मंत्रालयाने दूताला घेतलं बोलावून

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी अटक केली आहे. या अटकेवर जर्मनीने टिपण्णी केली. त्यानंतर भारताने त्याचा कडक शब्दात विरोध केलाय.

संतोष कानडे

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी अटक केली आहे. या अटकेवर जर्मनीने टिपण्णी केली. त्यानंतर भारताने त्याचा कडक शब्दात विरोध केलाय.

जर्मन दूतावासाचे उपप्रमुख जॉर्ज एनजवीलर यांना शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतरित्या विरोध केल्यामुळे बोलावून घेतले होते. एनजवीलर यांना सकाळी राजधानी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमधून परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातून बाहेर पडताना अनेकांनी बघितलं.

परराष्ट्र मंत्रालयाने जर्मन दूतासमोर म्हटलं की, त्यांच्या देशाने केलेली टिपण्णी भारतातल्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करणारी होती. देशातील न्यायिक प्रकरणात हस्तक्षेप करणं योग्य नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, अशा टिपण्ण्यांकडे आम्ही आमच्या न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप म्हमून बघतो. शिवाय आमच्या न्यायपालीकेच्या स्वतंत्रतेला कमकुवत करण्याच्या उद्देशाच्या रुपाने बघतो. भारत हा कायद्याचं राज्य असलेला मजबूत लोकशाही असलेला देश आहे.

मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने पुढे म्हटलं की, ज्या पद्धतीने भारतात आणि इतर लोकशाही देशांमध्ये कायद्याची प्रक्रिया असते, तशीच प्रक्रिया या प्रकरणातही सुरु आहे. कायदा आपलं काम करत आहे.

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की, आम्ही प्रकरणाची माहिती घेतली आहे. भारत एक लोकशाही असलेला देश आहे. आम्हाला आशा आहे की, न्यायपालीकेचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या तत्त्वांना या प्रकरणात लागू केलं जाईल. केजरीवाल यांना निष्पक्ष सुनावणीचा पूर्ण अधिकार आहे. ते विनासायास सगळ्या आयुधांचा वापर करु शकतील. दोष सिद्ध होण्यापूर्वी सर्वांना निर्दोष समजणं हे एक कायद्याचं मूळ तत्त्व आहे. या केसच्या संदर्भातही हे तत्त्व लागू झालं पाहिजे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान शुक्रवारी केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवालांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

Latur to Badlapur: लातूर ते मुंबई प्रवास फक्त ५.५ तासांत होणार! कोकण–मराठवाड्याला थेट जोडणारा हाय-स्पीड हायवे मंजूर, पाहा मार्ग

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष, आम्ही जनतेचे आभार मानतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT