Corona Test sakal
देश

देशात 2.60 लाख लसवंतांना कोरोना

केंद्र सरकारनेच दिली आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लस (vaccine) घेतल्यानंतरही कोरोनाचा (corona) संसर्ग होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारनेच त्याची आकडेवारी दिली आहे. यात प्रामुख्याने पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना (corona) संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. पण प्रत्येकालाच संसर्ग झालेला नाही. प्राथमिक अहवालानुसार देशात आतापर्यंत २.६० लाख नागरिकांना संसर्ग झाला आहे.

लसीनंतरच्या संसर्गाविषयी माहिती गोळा करण्यासाठी सरकार स्वतंत्र तपशील जमा करीत असून, त्याचे विश्‍लेषण होईल. संसर्गाची बहुतेक प्रकरणे पहिल्या डोसनंतर नोंदवली गेली आहेत. लसीकरणाशी या आकडेवारीची तुलना केल्यास लस घेतल्यानंतर केवळ ०.०४ टक्के लोक संसर्गाने ग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत २ लाख ५८ हजार ५६० लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसात देशात संक्रमित (ब्रेक थ्रू इन्फेक्शन्स) रुग्णांची संख्या समोर आली आहे.

कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत एक लाख ७१ हजार ५११ लोकांना पहिला डोस मिळाल्यानंतर कोरोना झाला, तर दुसरा डोस घेतल्यानंतर ८७ हजार ४९ लोक संसर्गाच्या विळख्यात आले. भारतात हे ब्रेक थ्रू इन्फेक्शनची प्रकरणे डेल्टामुळे वाढत आहेत. यामुळे आजारातील चढउतार दिसत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने काल ५६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.५२ टक्के कायम असून, तो मार्चपासून आजवरच्या सर्वोच्च पातळीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI MPC Repo Rate: RBIचा रेपो दराबाबत मोठा निर्णय! तुमचा EMI कमी झाला की वाढला? होम लोन, पर्सनल लोनचं काय होणार?

धक धक गर्लला लागला जॅकपॉट! 18 वर्षांत तब्बल 824% नफा; माधुरी दीक्षितने ₹52 लाखांची प्रॉपर्टी विकली तब्बल 'इतक्या' कोटींना

Ajit Agarkar News : अजित आगरकरचा करेक्ट कार्यक्रम? रोहितला नडायला गेला अन् BCCI ने गेम केला; 'त्या' वृत्तानंतर चक्र फिरली...

इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली, KDMCच्या रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; करावी लागली शस्त्रक्रिया

Pune Politics: पुण्यात काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी काँग्रेसचा निषेध

SCROLL FOR NEXT