Gulab Nabi azad esakal
देश

Kashmir: काँग्रेसला धक्यावर धक्के: आझाद यांच्या समर्थनासाठी 51 नेते देणार राजीनामा

आझाद जम्मू कश्मिरमध्ये नवा पक्ष काढण्याची तयारी करत अल्याच्या अनेक बातम्या येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गुलाब नबी आझाद यांनी कॉंग्रेसला राम राम केल्या नंतर कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. माहिती मिळतेय की जम्मू कश्मिरमध्ये तब्बल 51 कॉंग्रेस नेते आणि पदाधिकरी आपल्या पदांचे राजीनामे देणार आहेत. ते सगळे नेते आझाद यांच्या सोबत जाणार असल्याचे समजते. याच्या आगोदर सुध्दा अनेक नेत्यानी आझाद यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. आझाद जम्मू कश्मिरमध्ये नवा पक्ष काढण्याची तयारी करत अल्याच्या अनेक बातम्या येत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार मंगळवारी अनेक नेते कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवू शकतात. सोमवारी राज्याच्या माजी विधानसभा उपअध्यक्षांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर आजी-माजी मंत्री आणि आमदारांसह पक्षाच्या जवळपास डझनभर ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे देऊन आझाद यांना पाठिंबा दिला आहे.

तसेच मोठ्या संख्येने पंचायत समिती सदस्यांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी आझाद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की कश्मिर मधील 95% राजकीय संस्था, राजकीय नेत्यांनी आझाद यांना पाठिंबा दिला आहे. आझाद यांनी सोनिया गांधी यांना 5 पाणी पत्र लिहून राजीनाम्याची कारणे दिली होती, आणि यातच राहूल गांधी यांच्या वर टिका केली होती.

काँग्रेसची नाराजी

मोठ्या संख्येने नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने आझाद यांचे प्रकरण पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी जोडले आहे. फरक असा आहे की सिंग यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर ते एकाकी पडले होते आणि पक्षाचे काही नेते त्यांच्यासोबत आले होते. जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रमुख विकार रसूल म्हणाले, “ज्यांनी पक्ष सोडला आहे, त्यांना आम्ही रद्दी समजतो. नवीन दृष्टीकोन घेऊन आम्ही नवीन लोकांना आणू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT